आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पार्टीचा माजी आमदार त्यांच्याच पक्षातील दिवंगत खासदाराच्या मुलाला हात पाय तोडण्याची धमकी देतो, अरेरावी करतो. दोन चार केस झाल्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणत कायद्याला जुमानत नाही. खुलेआमपणे सोशल मीडियातून या धमकीची क्लिप व्हायरल होत आहे. तरीही पोलिस प्रशासन दाखल घेत नाही. येत्या पाच दिवसात या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास महाविकास आघाडी तीव्र आंदोलन करेल, या विषयावर विधीमंडळात आवाज उठविण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. या प्रकरणी तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. त्यानंतर तनपुरे बोलत होते. तनपुरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिषेक भगत यांच्या घरावर १०० जणांचा जमाव चाल करून गेला. त्याठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. तेथील मंदिराचा वाद न्यायालयात आहे. न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच निकाल लागल्याचे सांगतात. वास्तविक असे काहीच झालेले नाही. त्यानंतर आता ही क्लिप व्हायरल झाली आहे.
ज्यांनी कायदे मंडळात काम केले, असे भाजपचे माजी आमदार कायद्याला जुमानत नाहीत. आता ते सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यामुळे या प्रकरणात वरून दबाव आहे का? खुलेआमपणे क्लिप व्हायरल होत असूनही पोलिस प्रशासन दाखल घेत नाही. सत्ताधारी लोकांना पाठीशी घालत आहेत. संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे कायद्याचे राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती आजची नाही. कित्येक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यांची परिसरात मोठी दहशत आहे. समाजातील त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी समाजात योग्य संदेश जावा, यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
दुहेरी हत्याकांडाच्या पुनरावृत्तीची शक्यता
केस अंगावर पडल्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असे म्हणणे म्हणजे थेट पोलिसांनाच आव्हान आहे. हा दहशतीचा सो-धा पॅटर्न आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय हल्ला प्रकरणात ते जामिनावर असून केडगाव दुहेरी हत्याकांडात देखील आरोपी राहिलेले आहेत. दुहेरी हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गांधी, भगत यांना दिलेली धमकी ही पोस प्शासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.'' किरण काळे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.