आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक वृक्ष क्रांती घडवत:माजी सैनिक घडवताहेत वृक्ष क्रांती : नरवडे

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय हिंदच्या माध्यमातून माजी सैनिक वृक्ष क्रांती घडवत आहे. जिल्ह्यातील डोंगर, पर्वत रांगांसह उजाड माळरान हिरवाईने फुलविण्यासाठी जय हिंदचे कार्य प्रेरणादायी आहे. या लोकचळवळीत ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन नगर तालुक्यातील टाकळीचे (खात) सरपंच सुनील नरवडे यांनी केले.

जिल्हाभर वृक्षरोपण अभियान राबविणार्‍या जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने माजी सैनिकांनी नगर तालुक्यातील टाकळी (खात) गावात वृक्षारोपण केले. गावातील शहीद स्मारक, ग्रामपंचायत व स्मशान भूमी परिसरात ४१ झाडांची लागवड करण्यात आली. त्यावेळी नरवडे बोलत होते. या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी सोसायटीचे चेअरमन राजू नरवडे, राजाराम गायकवाड, रामदास शिवे, चेअरमन रामचंद्र शिवे, भास्कर पादीर, राजाराम, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, महादेव शिरसाठ, रावसाहेब कळमकर, रावसाहेब कोल्हे, म्हातारदेव मुळे, निवृत्ती जाधव आदींसह माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

शिवाजी पालवे यांनी महाराष्ट्र कायमचा दुष्काळ मुक्त करण्यासाठी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. झाडांमुळे पर्यावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढून वातावरण निरोगी बनणार असल्याचे सांगितले. रामचंद्र शिवे यांनी देशाचे माजी सैनिक देश रक्षण करून निवृत्त झाल्यानंतर भारत मातेच्या सेवेसाठी देत असलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी वटवृक्ष, चिंच, करंज, भेंडी अशी झाडांची लागवड करण्यात आली. गावातील थ्री माजी सैनिक संघटनेने लावलेली सर्व झाडे जगविण्याची जबाबदारी स्विकारली असून, त्याचे संवर्धन केले जाणार असल्याचे मेजर बापू गायकवाड यांनी सांगितले. मेजर शिवाजी पठाडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...