आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परजणे यांचा उपक्रम, महिला व कार्यकर्त्यांचाही सन्मान

कोपरगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दौपदी मुर्मू यांची निवड झाल्याच्या आनंदाप्रित्यर्थ संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय व जनता इंग्लिश स्कूलमधील आदिवासी समाजातील मुलींना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे यांच्यावतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजातील ज्येष्ठ महिला दौपदी मुर्मू यांची निवड झाल्याच्या प्रित्यर्य संवत्सर येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात परिसरातील आदिवासी समाजातील महिला, पुरुष व शाळकरी मुलींना निमंत्रित करून व मिठाईचे वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष परजणे यांच्यातर्फे आदिवासी शाळकरी मुलींना वह्यांचे वाटप करण्यात आले. तर समाजातील ज्येष्ठ महिला व कार्यकर्त्यांचा सरपंच सुलोचना ढेपले यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या दौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याने देशातील आदिवासी तसेच महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला, असे राजेश परजणे म्हणाले.

या कार्यक्रमास पंचायत समितीचे उप अभियंता चांगदेव लाटे, शाखा अभियंता गणेश गुंजाळ, अश्विन वाघ, सरपंच सौ. सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे, मुख्याध्यापक रमेश मोरे, शिक्षक सुनील वाघमारे, लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, अनिल आचारी, दिलीपराव ढेपले. बापू तिरमखे, ग्रामविस्तार अधिकारी आहिरे, लक्ष्मीबाई गायकवाड, आक्काबाई गायकवाड, हिराबाई गायकवाड, पद्मा माळी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...