आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीगोंदे तालुका विधी सेवा समिती, वकील संघ श्रीगोंदे व आरोग्य विभागाने स्वामी विवेकानंद आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात १ हजार ६४२ रुग्णांची तपासणी करुन त्यांना दहा लाखांची औषधे वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन शासकीय पुरुष भिक्षेकरी गृहातील भिक्षेकरी, स्नेहालय संस्थेतील मुले व आश्रम शाळेतील मुले यांची तपासणी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डावरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते तपासणी करून करण्यात आले.
या शिबिरात तपासणीसाठी डॉ. डी. एस. लोणकर, डॉ. गिरीश काकडे, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. आनंद कटारिया, डॉ. भूषण खर्चे, डॉ. विक्रांत भगत, डॉ. गणेश मैड, डॉ. राजेंद्र गुंजाळ, डॉ. रोहित धूत, डॉ. चैत्राली काळोखे, डॉ. राजश्री पगारिया, डॉ. प्रशांत निर्मल, डॉ. प्रदीप कंठाळी, साईदीप हॉस्पिटल अहमदनगर, मॅक्स केअर हॉस्पिटल अहमदनगर, महालक्ष्मी हॉस्पिटल दौंड, डॉ. नीलेश भुसारी, डॉ. जीवन माजगावकर डॉ. सागर ताकपेरे, प्राचार्य डॉ. अजित कदम, डॉ, आनंद काकडे व तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांनी सहकार्य केले.
या शिबिरासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख, जिल्हा न्यायाधीश एन. जी. शुक्ल, प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, अतिरिक्त जिल् ल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डावरे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र सोनवणे, दिवाणी न्यायाधीश गिरीश एम साधले, निनाद काकडे, एच जे पठाण, गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप, गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे, नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रय बी. झराड, त्यांचे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विश्वस्त झुंबरराव बोरुडे व सुहास बोरुडे सहकार्य मिळाले उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.