आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारीशक्ती:शिक्षणापेक्षा अनुभव असतो महत्त्वाचा, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानतर्फे स्त्री शक्तीचा सन्मान कार्यक्रमात 51 महिलांचा गौरव

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणापेक्षा अनुभव महत्त्वाचा आहे आज ज्यांना पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महिलांमध्ये यशस्वी होण्याचे गुण असतात, पण त्यांना संधी मिळाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांनी केले.

सावेडी येथील संदेशनगरमध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानतर्फे स्त्री शक्तीचा सन्मान हा कार्यक्रम झाला. यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, पोलिस प्रशासन इत्यादी क्षेत्रांमध्ये उत्कृस्ट काम करणाऱ्या ५१ महिलांचा विखे यांच्या हस्ते सन्मानपत्र व झाड देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमास तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, अंजली वल्लाकट्टी, सीमा त्रिंबके, नगरसेविका संध्या पवार, चैत्राली जावळे, १०८ रुग्णवाहिकेच्या जिल्हा व्यवस्थापिका कांचन बिडवे, अनुजा कांबळे, पल्लवी दराडे, सिंधू वाणी आदी उपस्थित होत्या. याप्रसंगी विखे यांनी उपस्थित महिलांना बचत गटातील विविध उदाहरणे देऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले.

शिर्डी येथे गुलाबाच्या फुलांपासून उदबत्ती, पेन्सिल बनवली जाते, तर साईज्योती प्रदर्शनातील यशस्वी झालेल्या महिलांचे अनुभव सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक सुनील त्रिंबके यांनी, सूत्रसंचालन ज्योती थोरात व योगिता मोहिते यांनी, तर आभार योगेश पिंपळे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...