आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जिलेटीन कांड्यांचा स्फोट करून एटीएम मशिन फोडले ; जखणगाव येथील घटना

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिलेटीन कांड्यांचा वापर करून स्फोट घडवून एटीएम मशीन फोडल्याची घटना जखणगाव (ता. नगर) शिवारातील कुंदन हॉटेलच्या शेजारी रविवारी पहाटे घडली. दरम्यान या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मनोहर तबाजी काळे (वय ३१, रा. जखणगाव) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चार चोरटे वाहनातून आले. त्यांनी कुंदन हॉटेलच्या शेजारी असलेले वक्रंगी कंपनीचे एटीएम मशीन बसवलेल्या गाळ्याचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. एटीएम मशीनच्या खाली जिलेटीन कांड्या लावल्या. स्फोट घडवून एटीएम मशीन फोडले. दरम्यान, या एटीएममध्ये रक्कम नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. दरम्यान, स्फोट झाल्याने परिसरात आवाज झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. नगर ग्रामीणचे प्रभारी उपअधीक्षक अनिल कातकडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक रणजित मारग यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. चार चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये स्फोट केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यात शिर्डी, संगमनेर येथे देखील अशा पध्दतीने एटीएम फोडून रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...