आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पीएम किसान योजनेच्या केवायसीला मुदतवाढ

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक असताना संगमनेर तालुक्यात २१ हजार ७९८ शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही. या शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी करून घ्यावी, अन्यथा बारावा हप्ता बँकेत जमा होणार नाही, असे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. आत राहिलेल्या लाभार्थीना बुधवारपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली.

प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये निधी दिला जात आहे. प्रत्येक चार महिन्याला २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतो. काही लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खाते व आधार कार्डवर असलेले नावात फरक आढळून येत असल्याने योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा होताना अडचणी निर्माण होत आहे. यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला शासनाने ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले. आता मुदत वाढ मिळाल्याने उर्वरित लाभार्थीनी ७ सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी न केल्यास पुढील हप्ते मिळणार नाही. यामुळे मुदतवाढीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रविण गोसावी व गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...