आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी आमदार व भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधीसह तून १७ गावांत २०१९ मध्ये प्रत्येकी २५ व १० लाख रुपयांची सामाजिक सभागृहांची कामे मंजूर झाली होती. आता चार वर्षे होत आली, तरी प्रत्येक बैठकीत ‘चौकशी करून सांगतो’ असे एकच साचेबंद उत्तर ऐकायला मिळते. याबाबत प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी स्तरावर उपोषण करावे का, असा संतप्त सवाल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरूडे यांना केला.
तसेच, ही सामाजिक सभागृहे यापूर्वीच तयार झाली असती, तर आदिवासी, अल्पसंख्यांक, गोरगरीबांचे विविध कार्यक्रम त्यात संपन्न झाले असते. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दुवाही दिला असता, असेही कोल्हे म्हणाले.
तहसील कार्यालयात आयोजित ‘जनता दरबारा’त विवेक कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, की २०१९ मध्ये दहेगाव बोलका, टाकळी, ब्राम्हणगाव, येसगाव, सुरेगाव, करंजी, रांजणगाव देशमुख, शिरसगाव, वारी, तळेगाव मळे, कोकमठाण, खोपडी, उक्कडगाव, घोयेगाव, शिंगणापूर, शहापूर आणि जेऊर पाटोदा येथे सामाजिक सभागृहांची कामे मंजूर झाली होती.
मात्र, अजूनही ही कामे झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे. गोरगरीबांसाठी केंद्र व राज्य शासन स्वस्त धान्य पुरवठा करते, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून त्याचे वितरण होत नाही. हा माल काळ्याबाजारात विकून गोरगरीबांना स्वस्त धान्यापासून वंचित ठेवल्याच्या प्रचंड तक्रारी पुराव्यानिशी आपल्याकडे आल्या आहेत. मतदारसंघातील नागरिकांना तात्काळ स्वस्त धान्याचा पुरवठा व्हावा, नवीन, दुबार रेशनकार्डसाठी स्टेशनरीचे कारण सांगून अडवणूक होते. त्यात संबंधित यंत्रणेने तात्काळ लक्ष घालून समस्येचे निराकारण करावे. गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही प्रलंबित प्रश्न पोटतिडकीने मांडत असूनही त्यावर ठोस कार्यवाही होत नसेल, तर वेगळ्या मार्गाने प्रश्न हाताळावे लागतील, असा इशारा कोल्हे यांनी दिला.
पराग संधान म्हणाले, की शहरात अस्वच्छ पाणीपुरवठा होत असून, त्यातून रोगराई वाढते आहे. रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुमार आहे. विरोधकांच्या कामाला रात्रीतून तांत्रीक मान्यता दिली जाते, दुसरीकडे विकासाचे काम कोल्हे कुटूंबीयांनी अडविले, म्हणून राजकीय टीका-टिप्पणी केली जाते. मग यामागेही राजकीय हात आहे काय? या वेळी ज्ञानदेव औताडे, माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, जनार्दन कदम यांच्यासह उक्कडगाव, मळेगाव चडी, चांदगव्हाण, धारणगाव, ब्राम्हणगाव, टाकळी, वारी, रांजणगाव, देशमुख, मनेगाव येथील शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. शरद थोरात, विजय आढाव, साहेबराव रोहोम, विक्रम पाचोरे, दीपक चौधरी, कैलास राहणे, दत्तात्रय सावंत, राजेंद्र सोनवणे, बबलू वाणी, स्वप्निल निखाडे, संदीप देवकर, भिमा संवत्सरकर, डॉ. विजय काळे, रवींद्र आगवण आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.