आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोळ्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया:स्वत:च केले स्वत:साठी नेत्रदान अन् अंधत्व झाले दूर; अहमदनगरचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केली दुर्मिळ शस्त्रक्रिया

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवघड शस्त्रक्रिया केल्याने डॉ. प्रकाश कांकरिया यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे

डोळ्यावर (बुबुळावर) टीक पडल्यानंतर येणारे अंधत्वाचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी मरणोत्तर नेत्रदान केल्यानंतर हे डोळे काढून नेत्रपेढीकडे जमा करावे लागतात व नंतर विशेष सर्जनकडून ही नेत्ररोपणाची शस्त्रक्रिया केल्यानंतर या अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होऊ शकते. कोरोनाच्या संकटामुळे नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी लक्ष्मणराव बोहरे (८०, रा. परंडा, जिल्हा उस्मानाबाद) यांच्या एका डोळ्यात अपघाताने जखम झाल्यामुळे व त्यात जंतुसंसर्ग झाल्यामुळे डोळ्यात जखम होऊन टीक पडली व दुसरा डोळ्याला मेंदूपासून येणारी नस बंद पडल्यामुळे पूर्णपणे अंधत्व आले होते. लक्ष्मणराव अहमदनगरला साई सूर्य नेत्रसेवा संस्थेत आले. नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी त्यांच्या डाव्या डोळ्याचे बुबुळ काढून उजव्या डोळ्यावर रोपण केले व त्या डोळ्याने त्यांना दिसू लागले.

अवघड शस्त्रक्रिया केल्याने भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. महीपाल सचदेव व आयबँक असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष पद्मश्री प्रो. डॉ. जीवन टिटियाल यांनी नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या उपक्रमात डॉ. अनिल सिंग तसेच डॉ. चिन्मय ब्रह्मे व साई सूर्य नेत्रसेवाच्या टीमचे विशेष सहकार्य लाभले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser