आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:‘फिनिक्स’च्या शिबिरात 342 रुग्णांची नेत्र तपासणी; श्रीविशाल देवस्थान व फिनिक्सच्या माध्यमातून अद्यावत नेत्रालय उभारणार : आगरकर

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्य गरजू घटकातील दृष्टीदोष असलेल्यांना नवदृष्टी देण्याचे कार्य मागील २७ वर्षांपासून फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे करत आहे. या अविरत सेवेचे मूल्यमापन होऊन त्याची शासन स्तरावर दखल घेण्याची गरज आहे. श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्ट व फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून शहरात गोर-गरीब रुग्णांच्या सेवेसाठी अद्यावत नेत्रालय उभे करण्याचा मानस श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी व्यक्त केला.

फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शहराचे ग्रामदैवत श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगरकर बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, पंडित खरपुडे, बापूसाहेब कानडे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, यादव एकाडे, हरिभाऊ फुलसौंदर, रंगनाथ फुलसौंदर, ज्ञानेश्वर रासकर, पांडुरंग नन्नवरे, गजानन ससाणे, संजय चाफे, हरिश्चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, विजयकुमार कोथिंबिरे, रंगनाथ पुंड, अमित खामकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जालिंदर बोरुडे यांनी मागील २५ वर्षांपासून फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या आरोग्य सेवा, नेत्रदान व अवयव दान चळवळीत सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी श्रीविशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेले किशोर डागवाले यांचा सत्कार करण्यात आला. सावता महाराज मंदिरात झालेल्या या शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये ३४२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर ७३ रुग्णांवर पुणे येथील के. के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. सूत्रसंचालन राजेंद्र बोरुडे यांनी केले. आभार मोहनीराज कुऱ्हे यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी ओम बोरुडे, जय बोरुडे, जगदीश बोरुडे, साई धाडगे आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...