आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशालेय जीवनात दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. वर्षभर शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीची व कष्टाचे फळ या परिक्षेत्र मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे जावे, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी केले.
रेसिडेन्शियल हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष झावरे यांनी परीक्षेसाठी गुलाबपुष्प देऊन स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपाध्यक्ष रामचंद्र दरे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, उपप्राचार्या संगिता ठुबे, पर्यवेक्षक धनंजय म्हस्के, अर्जुन भुजबळ उपस्थित होते.
प्राचार्य विजयकुमार पोकळे म्हणाले, आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या आहे. विद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. कॉपीमुक्त सेंटरसाठी विविध उपाययोजना करण्यात आले आहे. परिक्षांचे चित्रकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. शिक्षण विभागाचे भरारी पथकही या ठिकाणी येऊन आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांची मोठी गर्दी झाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.