आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीने काढलेला महामोर्चा फेल गेल्याची टीका करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर उत्तरे नाहीत. त्यांनी मोर्चावर उत्तरे न देता जनतेच्या प्रश्नांवर उत्तरे दिली असती तर उचित झाले असते, असा टोला माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
थोरात यांनी कुटुंबासह रविवारी आपल्या जोर्वे गावी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते बाेलत हाेते.थोरात म्हणाले, मोर्चात अपेक्षेपेक्षा मोठा जनसमुदाय उपस्थित राहिल्याने शिंदे-फडणवीस सरकारला धडकी भरली आहे. सीमाप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राची अवहेलना करतात, त्यावर व गुजरातला गेलेले प्रकल्प महागाई, बेरोजगारी ते काहीच बोलत नाहीत. फक्त महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य भाजपकडून सुरु आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.