आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर अग्निवीरमध्ये भरती झाल्याचे बनावट कॉल लेटर घेऊन येथील एमआयसी अॅण्ड एसमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या चौघांची बनवेगिरी उघड झाली आहे.
त्यांच्यासह बनावट कॉल लेटर देणारे दोघे, अशा सहा जणांवर भिंगार कॅम्प ठाण्यात सैन्य दलाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांची टोळी जेरबंद करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
एमआयसी अॅण्ड एसमधील आयटी बटालीयनचे सुभेदार शिवाजी काळे (मुळ रा. डोंगरगण ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आदर्श कुंशवाह (वय १९ रा. रात्योरा पो. करपिया ता. कोरॉन जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), मोहितकुमार यादव (वय २५ रा. कासीमाबाद सारंगपूर पो. दांडूपूर ता. करचना जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), आनंद श्याम नारायण शर्मा (वय २३ रा. सडवा कला पी. सी गेट जवळ, पो. टीएसएल ता. करचना जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), अंशु राजेंद्र कुमार पटेल (वय २० रा. मांझीगांव मरोका पो. दांडी, ता. करचना जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), लोकेशकुमार राजपूत (वय २५ रा. मिरजापुर ता. जि. गौतमबुध्दनगर, उत्तरप्रदेश) व गोपाल चौधरी (वय २० रा. शिखरना पो. छरा, ता. हातरोली, जि. अलीगढ, उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
२३ मे रोजी रात्री आदर्श कुंशवाह, मोहितकुमार यादव, आनंद श्याम नारायण शर्मा व अंशु राजेंद्र कुमार पटेल हे त्यांच्या नावाचे कॉल लेटर घेऊन आले. गेटवरील बटालीयनचे आर. पी. हवालदार तलवीदंर सिंह यांनी या मुलांची कागदपत्रे तपासली असता त्यांना संशय आला. त्यांनी बटालीयनचे सुभेदार मेजर सत्यवीर सिंह, अॅड्युडेट मेजर राजपूत यांना चार मुलांचे कॉल लेटर हे बनावट असल्याचा रिपोर्ट दिला. त्यानंतर २४ मे रोजी सकाळी साडेआठ वाजता आयटी बटालीयन ऑफिसमध्ये मेजर संजया बिशनोई यांच्यासमोर त्या चौघांना हजर केले.
या चौघांनी ट्रेनिंगसाठी सादर केलेले कॉल लेटर हे बनावट असल्याचे समोर आले. या चारही मुलांकडे चौकशी केली असता हे बनावट लेटर लोकेशकुमार राजपूत व गोपाल चौधरी यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ते नगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनाही ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.