आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोळी:बनावट लग्न करुन लुटणाऱ्या टोळीचे रॅकेट उघड ; निरीक्षक ढिकले यांच्या पथकाची कारवाई

श्रीगोंदे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट लग्न करुन लुटणाऱ्या टोळीचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या पथकाने तीन दिवसात रॅकेट उघड केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या. भानगाव येथील रामदास शिवाजी साबळे यांच्याशी लग्नाचा बहाणा करुन २ लाख ५० हजाराला फसवले. या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात बनावट नवरीबाई सह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ६ जून रोजी भानगाव शिवारात घडली होती. श्रीगोंदे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या पथकाने बनावट लग्न करुन लुटणाऱ्या टोळीचे तीन रॅकेट उघड केले. या प्रकरणी काजल उर्फ कांचन अनिल श्रीवास्तव रा.इकवार बाजार वर्धा (नवरी), अजित धर्मपाल पाटील रा. कात्री. ता हिंगणघाट, वर्धा, (नवरीचा भाऊ), बळीराम नरोजी नलबले,रा. वाळकेवाडी ता.लोहा, जि. नांदेड (लग्न मध्यस्थी), माधव काशिनाथ सवण रा. माळबोरगाव, ता. किनवट,जि. नांदेड, मुलीचा मामा दिगंबर देवराव आंबुरे रा. माळ बोरगाव ता. किनवट, जि. नांदेड (मुलीचा नातेवाईक) या भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आला श्रीगोंदे पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या. भानगाव येथील रामदास साबळे यांचे कोपर्डी येथील एजंट व हिंगणघाट (वर्धा) येथील पुनम मावशी, बंट्या व किनवट ता. उमरखेड येथील मामा यांनी भानगाव येथील लग्नाळू मुलगा याचे २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम घेऊन बनावट नवरी बबलीबरोबर लग्न लावण्याचे ठरवले. ६ जून रोजी मुहूर्त काढला. नवरदेवाने मुलीला अडीच लाखांचे दागिने घेऊन लग्न केले. ९ जून रोजी घरातील सर्व झोपेत असताना नवरी गाशा गुंडाळून पळून जाण्यासाठी पोही फाट्यावर आली. बंटी कार घेऊन वाट पाहत होता. तेवढ्यात नवरदेवाच्या नातेवाईकांनी बंटी आणि बबलीला पकडले.

पहिला नवरा झाला नवरीचा भाऊ नवरी कांचन श्रीवास्तव चा पहिला नवरा धर्मपाल पाटील हा नवरीचा भाऊ झाला कांचनचे रामदासशी लग्न झाल्या नंतर धर्मपाल ने नवरीचा भाऊ म्हणून रामदासचा कान पिळला. आणि तीन दिवसानंतर कांचनला भानगाव मधून बाहेर काढण्याचा डाव धर्मपाल ने रचला मात्र अश्या घटना श्रीगोंदे तालुक्यासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस घटना घडत आहेत यापासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन निरीक्षक ढिकले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...