आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्वस्त, आमदार, खासदार, राजकीय पदाधिकाऱ्यांचे पीए असल्याचे भासवत भाविकांकडून पैसे घेत झटपट व्हीआयपी साईदर्शन करून देणाऱ्या तोतया पीए व एजंटना आता साई मंदिर परिसरात ‘नो एन्ट्री’ असणार आहे. आजी-माजी मंत्री, आमदार, खासदार, विश्वस्तांना स्वीय सहायकाचे अधिकृत पत्र संस्थानला द्यावे लागणार आहे. व्हीआयपी दर्शनासाठीही आता एक दिवस आधीच संस्थानला माहिती कळवावी लागणार आहे. संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी ही माहिती दिली.
संस्थानच्या या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले. निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी होत आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कमी वेळेत साईदर्शन मिळावे यासाठी अनेक खासदार, आमदार, राजकीय नेत्यांनी शिर्डीत स्वीय सहायकांच्या नेमणुका केल्या. मात्र, याचा गैरफायदा बनावट पीए घेतात.
कर्मचाऱ्यांवर पीएंचा दबाव तोतया पीएंनी पीआरओ विभागावर कब्जा केला. कोणी दादाचे, कोणी साहेबांचे तर कोणी कोपरगावच्या दोन्ही साहेबांचे पाहुणे असल्याचे सांगत पीआरओमधील कर्मच्याऱ्यांवर दबाव आणत आहेत. साहेबांची माणसे असल्याचे खोटे सांगत त्यांनी मंदिर परिसरात दहशत निर्माण केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.