आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘वसुधैव कुटुंबकम'' ही संकल्पना परंपरागत तयार झालेली आहे. कुटुंब व्यवस्था भक्कम, सुदृढ होण्यासाठी सहवास, सन्मान, संवाद, समज, समन्वय, समरसता आणि सायोजकता या शब्दसूत्रींचा अवलंब केला पाहिजे, तरच कुटुंब आणि जीवन समृद्ध होते. ‘कुटुंब प्रबोधन'' हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आत्मियतेचा आणि जवळकीचा विषय आहे. आपले कुटुंब हे समाजापासून वेगळे नाही. कुटुंबांपासून समाज, राष्ट्र, विश्व तयार झाले असल्याचे प्रतिपादन समर्थभक्त, रामकथाकार, श्री मंदार बुवा रामदासी यांनी केले. कुटुंब प्रबोधन विभाग, नगर यांच्यातर्फे मधुरंजनी कार्यालयात आयोजित व्याख्यानमालेत कुटुंब व्यवस्थापनाविषयी ‘मन प्रबोधन'' या विषयावर समर्थ भक्त मंदार बुवा रामदासी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रांत समन्वयक रवींद्र देशपांडे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून व भारतमातेला पुष्पहार घालून करण्यात आले.
सांस्कृतिक आयमाचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख नंदकुमार देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद सोनटक्के यांनी नगर शहराचे कुटुंब प्रबोधनाच्या कार्याचा आढावा घेतला. प्रांत संयोजक रवींद्र जी. देशपांडे यांनी कुटुंब प्रबोधन कार्याची आवश्यकता विषद केली. आनंद ठिपसे यांनी आभार मानले. संघाचे महेंद्र, हिराकांत रामदासी, प्रवीण कुलकर्णी, राजाभाऊ काळे, संस्कार-भारतीचे ॲड. दीपक शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. भार्गव देशपांडे यांनी पद्य सादर केले. कार्यक्रमाची सांंगता पंडित हर्षद भावे यांनी आपल्या मधुर आवाजातील पसायदानाने केली.
कुटुंब प्रबोधनाचे कार्य देशभर
संपूर्ण देशभर कुटुंब प्रबोधन विभागाचे कार्य, संवाद आणि संपर्क या माध्यमातून केले जात आहे. सुरुवातीला मी माझ्याकडे पाहिले पाहिजे, या धारणेने सर्व कुटुंबे तयार होतील. पावसाचे पाणी आणि संतांची वाणी आपणा सर्वांचे जीवन समृद्ध करीत असल्याचे या वेळी रवींद्र देशपांडे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.