आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:पर्यावरणपूरक पध्दतीने गणरायाला दिला निरोप

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, पर्यावरण पूरक पध्दतीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशीला नगर तालुक्यातील दरेवाडी, वाकोडी फाटा येथे जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने कृत्रिम जलकुंडाची व्यवस्था करण्यात आली होती. गावात जल प्रदूषण टाळण्यासाठी साकारण्यात आलेल्या या जलकुंडात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गणेश मुर्त्यांचे विधीवत विसर्जन केले.

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या! चा गजर या जलकुंड परिसरात निनादला. तर जलकुंडात गणपती विसर्जन करणार्‍या भाविकांना प्रसादरुपी वृक्ष भेट देण्यात आले. जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून शहरासह उपनगर व नगर तालुक्यात दरवर्षी प्रमाणे पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा... संदेश देत शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे मोफत वितरण करण्यात आले होते.शुक्रवारी खास फाऊंडेशनच्या माध्यमातून दरेवाडी, वाकोडी फाटा येथे आकर्षक फुलांची सजावट व मांडव टाकून या जलकुंडाची निर्मिती करण्यात आली. या जलकुंडाचा अनावरण धर्मादाय आयुक्त वंदना पाटील- चव्हाण यांच्या हस्ते गणेश विसर्जनाने करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, संदीप राहींज, नयना बनकर, आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...