आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:शेतकरी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी यांना पाठवले पोस्टाने कांदे‎

नगर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कांद्याला मातीमोल भाव‎ मिळत आहे. शेतकऱ्यांनी जिवापाड‎ जपलेल्या कांद्याचा खर्चही निघणे‎ अवघड झाले आहे. यामुळे संतप्त‎ झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी‎ संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष‎ बच्च्ू मोढवे यांच्या नेतृत्वाखाली‎ सोमवारी (६ मार्च) नगर येथील‎ प्रधान डाकघर कार्यालयातून‎ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने‎ कांदे पाठवून कांदा निर्यात बंदीचा‎ निषेध नोंदवला.‎ सध्या शेतकऱ्यांच्या कांद्याला‎ प्रतिक्विंटल २०० ते ५०० रुपये भाव‎ मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक‎ शेतकऱ्यांत असंताेष आहे. दरम्यान,‎ कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ‎ सोमवारी दुपारी शेतकरी संघटनेच्या‎ वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना‎ पोस्टाने कांदे पाठवून निषेध व्यक्त‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करण्यात आला.

याप्रसंगी शेतकरी‎ संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बच्चू‎ मोढवे, शेतकरी विकास मंडळाचे‎ शिवराज कापरे, रमेश चिताळ,‎ धनंजय गायके, शिवाजी निमसे,‎ कुंडलिक चिताळ आदी उपस्थित‎ होते. जागतिक बाजारपेठेमध्ये‎ कांद्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या‎ असताना केंद्र सरकारने कांद्यावर‎ निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आपल्याला कांदा मातीमोल भावाने‎ विकण्याची वेळ आली. केंद्र‎ सरकारने निर्यात बंदी हटवून‎ कांद्याला जागतिक बाजारपेठेत‎ वाढलेल्या किमतीचा फायदा‎ शेतकऱ्यांना मिळून द्यावा, अशी‎ मागणी करण्यात आली.‎ शेतकऱ्यांना प्रतिकिलोला दहा रुपये‎ अनुदान त्वरित द्यावे, अशी मागणी‎ शेतकरी संघटनेने केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...