आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ७ जूनपासून वरुणराजाला सुरुवात होणार आहे. १५ जूनपर्यंत सर्व महाराष्ट्रभर पाऊस पडणार आहे. नगर जिल्ह्यात यंदा मोठया प्रमाणात पर्जन्यमान होणार असल्याने शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असे प्रतिपादन परभणी येथील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात पंजाबराव डख बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सरपंच डॉ.वारुळे, कृषी अधिकारी श्री. अनारसे, प्रशांत काटोळे , गोवर्धन मुसमाडे आदी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन व आरती झाली. प्रास्तविक के. एस अॅग्रोचे प्रमोद मुसमाडे यांनी केले. लॉकडाऊनमध्ये जगात अनेक कंपन्या बंद झाल्या. परंतु शेती नामक कंपनी सर्वत्र सुरू होती.अजूनही अनेक संकट जगावर, देशावर येणार आहेत.परंतु माझ्या बळीराजाची शेती कंपनी सुरूच राहणार आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान असल्याने शेतकरी बांधवांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे डख म्हणाले. या कार्यक्रमास ब्राह्मणगाव भांड, बोधेगाव, करजगाव, चांदेगाव, महाडुक सेंटर, पढेगाव, बेलापूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद मुसमाडे, तुषार मुसमाडे, तनिष मुसमाडे, प्रज्वल मुसमाडे, पद्माकर माळवदे, विलास आढाव, अविनाश काळे, धनंजय बोठे, नारायण वारुळे, शुभम शेळके, सोमनाथ काळे, प्रसाद शिंदे, रवींद्र वारुळे, एकनाथ काळे, मारुती काळे,सचिन काळे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.