आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसावर तांबेरा रोग:उसावरील तांबेरा रोगाने दहिगावनेचे शेतकरी त्रस्त

शेवगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने परिसरातील जायकवाडी धरण पट्ट्यातील हा परिसर आहे. या भागाला उसाच्या आगार समजले जाते. सध्या उसावर तांबेरा रोग पडला आहे. या रोगामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

ऊस पीक वाढीच्या अवस्थेत असताना उसाच्या कांड्या बारीक होऊन पानावरील तपकिरी ठिपके आलेले आहेत. हे ठिपके म्हणजे तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहेत. या रोगामुळे उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे त्पादनात मोठी घट होणार आहे. कमी जास्त पडणाऱ्या पावसामुळे आर्द्रता निर्माण होऊन काही भागात रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे एकापाठोपाठ अस्मनी संकटाची मालिका उभी ठा कली आहे. या परिसरातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूँग आधी पिचके पाण्यामुळे खराब झाली आहेत कांदा पिकाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे कांद्याला केलेला खर्च वसूल होत नाही. कांदा उत्पादन घेऊन शेतकऱ्यावर पश्चातापी वेळा आली आहे. हे सर्व पीक हाता तून गेले आहे सऊ पिकावर हे संकट उभे ठाकल्याने शेतकऱ्याच्या मनात मोठी धडकी भरली असून प्रशासनाने काही उपाययोजना कराव्यात, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.

कृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने येथील व संशोधक शास्त्रज्ञ डॉ. नारायण निंबे यांनी यासंदर्भात माहिती दिली. सऊ पिकावर हवेद्वारे व जमिनी द्वारे विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो सध्या परिस्थितीत सऊ पिकावर तांबेरा तपकिरी नारंगी रोग दिसून येत आहे तरी शेतकऱ्यांनी वरील रोगांच्या नियंत्रणासाठी आ क्सी स्ट्रॉबेरी, अझॉक्सी स्ट्रोबिन १८.२ टक्के अधिक डायफेन कोण्याझोल ११.४ टक्के अमिस्टार या बुरशीनाशकाची दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी रोग दिसल्यास काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...