आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:बिगर चिठ्ठीची कामे होणार असल्याने‎ शेतकऱ्यांना न्याय मिळेल : मुरकुटे‎

कौठा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या‎ रुपाने सर्वसामान्य माणसाला न्याय‎ मिळाला आहे. कर्डिले हे जिल्हा‎ बँकेचे अध्यक्ष झाल्यामुळे बिगर‎ चिठ्ठीची कामे मार्गी लागणार‎ असल्याने शेतकऱ्यांना न्याय‎ मिळणार आहे, असा विश्वास माजी‎ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी‎ व्यक्त केला.‎ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजप‎ माजी मंत्री कर्डिले यांची निवड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झाल्याबद्दल त्यांचा माजी आमदार‎ बाळासाहेब मुरकुटे यांनी मंगळवारी‎ पदभार स्वीकारताना सत्कार केला.‎

जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी‎ माजी आमदार कर्डिले याची मोठ्या‎ संघर्षातून निवड झाली. अत्यंत सोपी‎ असणारी ही निवडणूक ऐनवेळी‎ वेगळ्या वळणावर गेल्याने‎ अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.‎ माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना‎ हा जोरदार धक्का बसल्याने नेवासे,‎ शेवगाव, पाथर्डी तालुक्यात चर्चेचा‎ विषय बनला आहे.‎ मंगळवारी माजी आमदार मुरकुटे‎ यांनी नूतन अध्यक्षपदाचा पदभार‎ स्वीकारताना कर्डिले यांचा सत्कार‎ केला. यामुळे तालुक्यातील‎ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला‎ आहे. यावेळी तालुक्यातील काही‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...