आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी‎ उद्यापासून पुन्हा उपोषण‎

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच बदली झालेले पारनेर पोलिस‎ स्टेशनचे निरीक्षक व त्यांचे काही पोलिस‎ कर्मचाऱ्यांच्या विरोधात उपोषण करुन देखील‎ संबंधितांवर चौकशी होऊन कारवाई झाली नसल्याने‎ अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने‎ पुन्हा सोमवारपासून (६ मार्च) पोलिस अधीक्षक‎ कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे‎ जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.

पारनेर‎ तालुक्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक व त्याचे‎ काही पोलिस कर्मचारी पीडित तक्रारदारांवर‎ कुठल्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद नसताना‎ रात्री-अपरात्री त्यांच्या घरी जावून मारहाण करणे,‎ त्यांना उचलून पोलीस स्टेशनला आणने व‎ धमकावून अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी‎ सुरु असलेल्या पिळवणुकीविरोधात तक्रार करुन २३‎ फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आले होते. या‎ प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या वतीने सात दिवसाची‎ मुदत मागून उपोषण स्थगित करण्यात आले होते.‎ मात्र संबंधितांवर चौकधी करुन कारवाई होत‎ नसल्याने पुन्हा उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेण्यात‎ आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...