आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थगित:आव्हाड यांच्या मध्यस्थीनंतर पाथर्डीतील उपोषण स्थगित, शौचालयासंदर्भातील वाद अखेर संपुष्टात

पाथर्डी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार निधीतून होणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचा वाद अखेर संपुष्टात आला असून, पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनावर उपोषणकर्त्यांनी समाधान मानत संदीप काकडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

वीर सावरकर मैदान येथे शौचालय बांधण्याचे ठिकाण बदलून सुरू असलेले काम त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी बाजारकरी व्यापाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. मात्र, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी मध्यस्थी केल्यानंतर व मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन सायंकाळी उशिरा मागे घेण्यात आले.

पाथर्डी शहरात शौचालय नसल्याने यावरून नगरपरिषदेतील तत्कालीन व विद्यमान सत्ताधाऱ्यांना लोकांनी अनेकदा धारेवर धरून आंदोलने केली. त्यांनंतर आमदार मोनिका राजळे यांनी शौचालय बांधण्यासाठी पाथर्डी नगरपरिषदेला २० लाखांचा निधी दिला. नगरपरिषद कार्यालय लगतच्या जागेवर हिंद वसतिगृहासमोर हनुमान मंदिरजवळ हे शौचालय नियोजित होते. मात्र, येथील जागाच शासकीय दृष्ट्या चुकीची असल्याने माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी त्यास आक्षेप घेतल्याने ही जागा बदलून बाजार तळाजवळ हे शौचालय बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, बदललेली जागा चुकीची असून शौचालयामुळे दुर्गंधी पसरून व्यापारी आणि नगरपरिषदेच्या गाळेधारकांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे हे काम थांबवून शौचालय दुसरीकडे करावे, अशी मागणी बाजारकरी व्यापाऱ्यांनी करीत सोमवारी नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. त्यात संदीप काकडे, अण्णा हरेर, शाहनवाज शेख, सुरेश हंडाळ, अंबादास पालवे, बजरंग धस, अनिल लाटे, गणेश शिंदे, उमेश खैरे, संजय काटे, संभाजी धस, गणेश टेके, संजय टेके, नंदकिशोर भागवत, सचिन काकडे सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...