आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण‎:श्रमिक संघटित कष्टकरी‎ कामगार संघटनेचे उपोषण‎

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहिती अधिकार कायद्याची‎ कडक अंमलबजावणी करावी,‎ तसेच सेतू केंद्र व ई-सेवा केंद्रांना‎ ठरवून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक‎ दाखल्यासाठी दरआकारणी करावी,‎ त्याचे दर पत्रक दर्शनी भागात‎ लावावी, यांसह विविध‎ मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा‎ श्रमिक संघटित कष्टकरी कामगार‎ संघटनेतर्फे महसूल मंत्री राधाकृष्ण‎ विखे यांच्या कार्यालयासमोर‎ उपोषण करण्यात आले.

अहमदनगर‎ जिल्हा श्रमिक संघटित कष्टकरी‎ कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास‎ कराळे पाटील, सरचिटणीस गोरख‎ खांदवे पाटील, जुनेद बागवान,‎ लक्ष्मण ढगे पाटील, निलेश कांबळे,‎ प्रताप परदेशी, सुधीर वाकळे, सागर‎ लांडे, अशोक औषिकर, गोरख‎ खांदवे आदी यावेळी उपस्थित होते.‎ नागरिकांची आर्थिक लूट थांबवली‎ पाहिजे कामचुकार कर्मचाऱ्यांना‎ वटणीवर आणले पाहिजे व सेतू‎ केंद्रामध्ये होणारी नागरिकांची लूट‎ थांबून आजपर्यंत केलेल्या लुटीचे‎ पैसे सरकारच्या तिजोरीत जमा‎ करावे, आदी मागण्या या वेळी‎ करण्यात आल्या.‎

बातम्या आणखी आहेत...