आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:खोट्या दिव्यांगत्वाच्या‎ तपासणीसाठी उपोषण‎

नगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना‎ २०२० पदोन्नती दिली, अशा‎ कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची‎ तपासणी करून खोट्या दिव्यांगांवर‎ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी‎ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या‎ गवई गटाने मंगळवारी जिल्हा‎ परिषदेसमोर उपोषण केले.‎ आरपीआयच्या आंदोलन कर्त्यांनी‎ म्हटले आहे की, २०२० च्या दिव्यांग‎ पदोन्नती दिलेले काही कर्मचारी‎ शारिरीकदृष्ट्या सक्षम आहेत, असा‎ आमचा आरोप आहे.

परंतु, हा विषय‎ दडपण्याचा प्रयत्न होत आहे.‎ याप्रकरणात दोषी असलेल्या‎ अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात‎ यावी. हे प्रकरण गांर्भीर्याने घेऊन‎ दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग‎ तपासणी करावी, या मागणीसाठी‎ उपोषण सुरू केले आहे, असे विजय‎ शिरसाठ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...