आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराम्हशी घेऊन जाणारा पिकअप धारदार हत्याचारा धाक दाखवून पळविला. शुक्रवारी पहाटे नगर-औरंगाबाद रस्त्यावरील जेऊर (ता. नगर) शिवारात टोलनाक्याच्यापुढे ही घटना घडली. पिकअप, दोन म्हशी, चार मोबाईल, नऊ हजार रूपये रोख रक्कम असा २ लाख १७ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी तीन चोरट्यांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश महादेव मोरे (वय २३, रा. दौंड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मोरे त्यांच्या सहकार्यांसह अहमदनगर-औरंगाबाद रस्त्याने पिकअपमध्ये (एमएच ४२ एक्यू ५०१३) म्हशी घेऊन जात असताना पहाटे दोन वाजेच्या सुमारास जेऊर शिवारात टोलनाक्याच्यापुढे जरे वस्तीजवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. पिकअपला दुचाकी आडवी लावून हत्याचाराचा धाक दाखवित शिवीगाळ केली. फिर्यादी व सहकार्यांकडील मोबाईल, रोख रक्कम काढून घेत म्हशीसह पिकअप घेऊन चोरटे पसार झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.