आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सैन्यदलात निवड झालेल्या 6 विद्यार्थ्यांचा सत्कार

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल १ नोव्हेंबर रोजी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी होते. प्रास्ताविक एनसीसी प्रमुख लेफ्टनंट सतीश चोरमले यांनी करून महाविद्यालयातील एनएसएस युनिट आणि कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना सैन्य भरती संबंधित परीक्षावर मार्गदर्शन केले. यानंतर सैन्यदलात निवड झालेल्या राहुल उदमले, सुनील पवार, लहुराज मोरे, धनंजय इथापे, प्रदीप गांगर्डे, गणेश गायकवाड या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आयुष्यात जिद्द ठेवली, तर आपण आयुष्यातील कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते, असे प्राचार्य सूर्यवंशी यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. सूर्यवंशी म्हणाले, एनसीसीही विद्यार्थ्यांना भाकर देते. १९९३ साली चिंभळे या ठिकाणी एनएसएसचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर १९९३ आली २० विद्यार्थींची एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) सुरुवात झाली. आणि पदभार माझ्याकडे आला. त्यानंतर १९९४ साली ५३ युनिट संख्येला मंजुरी मिळाली. स्वताचे अस्तित्व उभे करण्यासाठी एनसीसी आहे. आयुष्यात ध्येयाचा पायंडा ठेवला, तर आपण आयुष्याताल कुठल्याही अडचणींचा सामना करू शकतो. त्यामुळे आपल्याला यशाचे शिखर गाठायला मदत मिळते.

आपल्या आयुष्यात जोश आणि जिद्द असेल, तर कोणत्याही अडचणींचा सामना आपण करू शकतो. या यशात आई-वडिल व प्राध्यापकांचे योगदान असल्याचे सांगितले. देशसेवेसाठी तरुणांनी लष्करात भरती व्हावं, असेही त्यांनी आवाहन केले. गुरू विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यासाठी महत्वाचं कार्य करतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत गिरमकर यांनी केले. आभार लेफ्टनंट सतीश चोरमले यांनी मानले. या वेळी प्रा. डी. जी. कर्पे, सुरेश रसाळ, एन. एस. साबळे, व्ही. सी. इथापे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...