आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:झोपडी कँटीन परिसरात दोन गटात हाणामारी ; चाकूने वार

नगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात दोन गटात मारामाऱ्या झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.सोनाली गुंजाळ (वय २५, रा. बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री आरोपी अशोक वाघ याने विशाल पाटोळे याला फोन करत आम्हा दोघांना श्रद्धा हॉटेल येथे बोलवले. तेथे उभे असताना वाघ त्याच्या मित्रांसह आला असता त्याने मारहाण करत चाकूने वार केला. मी भांडण सोडवण्यासाठी गेले असता मलाही चाकूने वार करत दगड मारला. राम राजू वाघ (वय २४, रा. भुतकरवाडी) यांनी फिर्यादीत म्हटले की, सोनाली गुंजाळ आणि विशाल पाटोळे यांनी भावाला मारहाण केली होती. त्याच्या रागातून ्र पाटोळे याने मित्रांच्या मदतीने भावाला शिवीगाळ केली. त्यानंतर शुक्रवारी आरोपी सोनाली गुंजाळ, विशाल पाटोळे, बंटी पाटोळे व त्याचे तीन मित्र भावाकडे आले. त्याबाबत भावाने माहिती दिली असता त्याला श्रद्धा हॉटेलच्या कंपाउंडच्या आतमध्ये जाण्यास सांगितले. मी तेथे गेलो असता आरोपींनी दगडाने मारत वस्तऱ्याने वार करून पळून गेले.

बातम्या आणखी आहेत...