आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • File A Case Against Those Responsible For Farmer Suicides, Otherwise District wide Agitation: Shiv Sangram Party District President Suresh Shete Warns Administration | Marathi News

इशारा:शेतकरी आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन : शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे यांचा प्रशासनाला इशारा

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

साखर कारखान्यांनी ऊसतोड न दिल्याने एका वयोवृद्ध शेतकऱ्याला आपला ऊस पेटवून आणि विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ या जिल्ह्यात येत असेल तर यापेक्षा शोकांतिका कुठली नसावी. म्हणून शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील वयोवृद्ध शेतकरी जनार्धन सिताराम माने (७० वर्षे) यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या कारखाना प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अन्यथा शिवसंग्राम पक्षातर्फे शेतकऱ्यांसह जिल्हाभर तीव्र असे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सुरेश शेटे यांनी दिला.

शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील वृद्ध जनार्धन माने या शेतकऱ्याने उसाला तोड येत नसल्याने आपला ऊस पेटवून विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांची शेटे, शेवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शेटे म्हणाले, या भागातील कारखाने हे कार्यक्षेत्र बाहेरुन ऊस आणतात, कार्यक्षेत्रातील ऊस नेण्यास आग्रक्रमाणे नेण्यास प्राधान्य देत नाही. ऊस तोडणीसाठी अतिरिक्त पैशाची मागणी केली जाते. आशा अनेक तक्रारींचा पाढा संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार, शिवसंग्रामचे तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यासमोर यावेळी मांडल्या. यावेळी शिवसंग्रामचे शेवगाव तालुकाध्यक्ष नवनाथ इसरवाडे, शिवसंग्रामचे नेवासे तालुकाध्यक्ष शामभाऊ ढोकने, शेतकरी संघटनेचे त्रिंबकराव भगदले, जगन्नाथ पाटील कोरडे, शिवसंग्रामचे पदाधिकारी संदीपराव बामदळे, विकास गटकळ, अशोक कुसळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगडे, अमोल देवडे, पप्पू उगलमुगले, तलाठी किशोर पवार, सर्पमित्र भाऊ बैरागी, मंडळाधिकारी ए. जी. शिंदे, अव्वल कारकून श्रीपाद गोरे, तलाठी शिरसाठ यांच्यासह आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.