आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भोकर येथील युवक अपहरण प्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करा; अतिरिक्त पोलिस अधिक्षकांना निवेदन

श्रीरामपूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकर येथील गेल्या काही दिवसापासून बेपत्ता असलेल्या दीपक बर्डेला पळून नेलेल्या आरोपींनीच त्याचा खून केला असून अटक झालेल्या आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केली.हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाने सोमवारी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांची वरील घटने संदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

श्रीरामपुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बाबा शिंदे, सुनील मुथ्या, अरुण पाटील,नागेश सावंत,किरण लुणीया, प्रवीण पैठणकर,तिलक डूंगरवाल, देविदास चव्हाण,मनोज हिवराळे, शशिकांत कडुस्कर,बबन जाधव,संजय यादव, गणेश भिसे, सोमनाथ पतंगे, अर्जुन कर्पे, सुरेश सोनवणे, संदीप वाघमारे, सिद्धार्थ साळवे, किशन ताकटे, महेश विश्वकर्मा, रितेश काटे, दिपक देशमुख, शरद थोरात, दीपक देशमुख, सोनू खवले आदींनी अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांना निवेदन दिले. ठिकठिकाणी असे प्रसंग घडत असून याला वेळीच पायाबंद घातला गेला पाहिजे.

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावायला नको. पोलीस तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा मिळता कामा नये, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी व आरोपीला शिक्षा होईल या दृष्टीने जबाबदारीने तपास व्हावा.श्रीरामपूर पोलिसिंग राहिलेली नाही. गुंड आणि चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. मुलींना टार्गेट करून संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. लेडीज जिममध्ये अनेक गैरप्रकार घडत असून बदनामीच्या भीतीने प्रकार पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही. काही प्रकारांमध्ये ट्रेनरच आरोपी होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...