आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकच्या सीएमवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा:नीलम गोऱ्हेंची मागणी, म्हणाल्या- मराठींजनांना चुचकारत भाजपचा कानडी मतांवरही डोळा

अहमदनगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका बाजूला मराठी भाषिकांना चुचकारायचे आणि दुसरीकडे कानडी मतांवरती डोळा ठेवायचा, असा भाजपशासित केंद्र सरकारचा डाव असावा ही शंका वाटते. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर व्यक्त करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी गुरुवार (24 नोव्हेंबर) ला केली.

कर्नाटकने सोलापूर,अक्कलकोटवर दावा सांगितला आहे. यातून कर्नाटकची वैचारिक दिवाळखोरी दिसते. याबाबत केंद्र सरकार तटस्थ भूमिका दाखवल्याचेही त्या म्हणाल्या.

अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर त्या शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. शिवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव ,शहर प्रमुख संभाजी कदम, युवा सेनेचे राज्यसचिव विक्रम राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात फूट पाडण्याचा प्रकार

गोऱ्हे म्हणाल्या, दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्वतःचे खास कायदेशीर प्रतिनिधी नेमले. त्यांची समिती केली. जतमधील काही गावांत कानडी भाषेमध्ये शाळांसाठी अनुदान कर्नाटक सरकारने जाहीर केले. हा त्यांचा उद्योग महाराष्ट्रामध्ये हस्तक्षेप करून फूट पाडायचा आहे. हे सातत्याने कर्नाटक सरकारने केले आहे.

केंद्राची भूमिका दुटप्पी

गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री वापरत असलेली भाषा जी आहे ती फार ओळखीची वाटते. जस पाकिस्तान करतो की ही चौकी आमची या पद्धतीनेच आक्रमणवादी भूमिका कर्नाटक सरकार घेत आहे , त्यांचेच केंद्र सरकार भूमिका मात्र तटस्थ दाखवत आहेत. पण मुळामध्ये एका बाजूला मराठी भाषिकांना चुचकारायचे आणि दुसरीकडे कानडी मतांवरती डोळा ठेवायचा, असा त्यांचा डाव असावा अशी शंका वाटते.

ही तर वैचारीक दिवाळखोरी

गोऱ्हे म्हणाल्या, कुठल्या नियमाने ते अक्कलकोट व सोलापूर वरती अत्याचार करण्याची भूमिका घेत आहेत. त्यामध्ये त्यांची खरोखर वैचारिक दिवाळखोरी दिसते. केंद्र सरकारने अशीच जर का बघ्याची भूमिका ठेवली तर एक चांगल्या लोकशाही पद्धतीनेच केंद्र सरकारला सुद्धा उत्तर महाराष्ट्राची जनता देईल याची जाणीव केंद्र सरकारने ठेवावी.

संयुक्त महाराष्ट्राचीच भूमिका

गोऱ्हे म्हणाल्या, संयुक्त आणि अखंड महाराष्ट्र हीच शिवसेनेची पहिल्यापासूनची भूमिका राहिली आहे. विकासाचा अनुशेष असेल तर त्याबाबत प्राधान्य द्यायला हवे. मात्र, एक संघ आणि संयुक्त महाराष्ट्र ही शिवसेनेची भूमिका आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...