आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील खर्डा चौकात सोमवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर एक हजार कोटी रुपये घेतल्याचा चुकीचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. या आरोपाची सखील चौकशी करून संबंधित शिवसेनेचे आमदार बांगर यांच्यावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचितच्या वतीने करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील भटके विमुक्त संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते जामखेड येथील खर्डा चौकात आमदार बांगर यांच्या पुतळ्याला जोडे मारुन निषेध करण्यात आला. यावेळी भटके-विमुक्तांचे राज्य समन्वयक अरुण जाधव, लोकाधिकार आंदोलन प्रवक्ते बापू ओहोळ, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश सदाफुले , जिल्हा संघटक भीमराव चव्हाण, आतिश पारवे, गणेश धायतडक, अक्षय समुद्र, मंगेश घोडेस्वार, अजिनाथ शिंदे, सुधीर कदम, संतोष चव्हाण, विशाल पवार, द्वारका पवार, बाजीराव गंगावणे, सचिन भिंगारदिवे, अतुल ढोणे, वैजीनाथ केसकर, सुदाम शेगर, हमीद नालबंद, बाबा लोहार, आयकाश काळे, विशाल समिदर, दादासाहेब गंगावणे, अरुण डोळस, गणपत कराळे, शहानुर काळे, भीमराव सुरवसे, लाला वाळके, अण्णा पवार, दत्तात्रय काळे, कल्याण आव्हाड, लता काळे, मनीषा भोसले, शारदा काळे आदी उपस्थित होते.
अरुण जाधव म्हणाले, अॅड. आंबेडकर यांच्या नातवावर चुकीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.