आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:वाहतुकीतील बदलाबाबत 10 पर्यंत हरकती दाखल करा; पोलिस विभागाचे आवाहन

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असल्याने शहरातील इंम्पेर‍िअल चौक ते सक्कर चौक दरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. याबाबत नागर‍िकांना काही हरकती असल्यास त्यांनी शहर वाहतूक न‍ियंत्रण शाखेत स्वत: उपस्थ‍ित राहून किंवा ई-मेलद्वारे १० जून पर्यंत हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रस‍िध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

पुणे कडून औरंगाबाद कडे जाणारे वाहतुकीसाठी मार्ग सक्कर चौक- टिळक रोड- आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर-राज पॅलेस रोड- स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नेप्ती नाका- टिळक रोडने पुणे व औरंगाबादकडे जाणारी वाहतूक नेप्ती नाका -आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर -राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे सुरू करण्यात आली आहे. नगर रेल्वे स्टेशनकडून पुण्याहून औरंगाबाद कडे जाणारी वाहतूक शक्कर- चौक टिळक रोड -आयुर्वेदिक कॉलेज कॉर्नर- राज पॅलेस रोड स्वस्तिक चौक मार्गे औरंगाबादकडे जाईल. तसेच अहमदनगर रेल्वे स्टेशन -कायनेटीक चौक मार्गे पुण्याकडे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद कडून पुणेकडे जाणारे वाहतूक इंम्पेरिअल चौक - चाणक्य चौक - आनंदऋषीजी हॉस्पीटल रोड- शक्कर चौक मार्गे पुणे तसेच ज्या वाहनचालकांना सक्कर चौक येथून अहमदनगर रेल्वे स्टेशनकडे जायचे असेल त्यांनी कायनेटीक चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणारे मार्गाचा वापर करावा.

याबाबत नागरिकांना काही हरकती असल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अहमदनगर येथे समक्ष येऊन किंवाpi.tfecity.anr@mahapolice.gov.in या ई-मेलवर १० जून २०२२ पूर्वी द्याव्यात, असे आवाहन ही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...