आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांची भेट:महामार्गांवरील खड्डे तात्काळ बुजवा ; महापौर रोहिणी शेंडगे यांच्या सुचना

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवरील खड्डे तातडीने बुजवावेत. कल्याण रोड ते नेप्ती नाका चौक ते सक्कर चौकापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशा सूचना महापौर रोहिणी शेंडगे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे दिल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती परिसरातील बहुतांशी रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित आहेत. या रखडलेल्या कामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही शेंडगे यांनी सांगितले.

औरंगाबाद रोड, मनमाड रोड, पुणे रोड या शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशा सूचना बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. तसेच कल्याण रोड ते नेप्ती नाका चौक ते सक्कर चौक हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत होत आहे. या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, असे पत्र महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे.

शहराच्या मध्यवर्ती परिसरातील बहुतांशी रस्ते बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित आहेत. यातील अनेक कामे रखडलेली आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे शेंडगे यांनी सांगितले. शहरात मनपाकडून प्रस्तावित असलेली कामे सुरू झाली आहेत. ठेकेदारांना वेळेत कामे पूर्ण करण्याबाबत नोटिसा बजावेल्या आहेत. मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्याचेही शेंडगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...