आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिळवण तेली समाज ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. विशेषत: मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी तज्ञांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन स्पर्धा, परिक्षांची तयारी करुन घेतली जात आहे. आर्थिक परिस्थितीने शिक्षणात खंड पडणार नाही, यासाठी ट्रस्ट दक्ष राहून मदतीचा हात देत आहे, असे प्रतिपादन उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर यांनी केले. तिळवण तेली समाज ट्रस्टतर्फे श्री संताजी महाराज शैक्षणिक मदत योजनेंतर्गत संगीता राजेंद्र देवकर हिस शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
याप्रसंगी उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव प्रसाद शिंदे, खजिनदार प्रकाश सैंदर आदि उपस्थित होते. संगीता देवकर हिने एमकॉम पूर्ण केले आहे. ती सध्या सीएस आणि एलएलबीचे शिक्षण घेत आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, विश्वस्त गोकुळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, नीता लोखंडे, शोभना धारक आदि उपस्थित होते. प्रास्तविकात प्रकाश सैंदर यांनी ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्या माध्यमातून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. आभार प्रसाद शिंदे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.