आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:मुकुंदनगर परिसरातील टेलरिंग दुकानास आग

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुकुंदनगर परिसरातील एका टेलरिंग दुकानाला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत दुकानातील सर्व माल जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कॅचीन्स टेलर्स या दरबार चौकातील दुकानाला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाला तत्काळ माहिती दिली. अग्निशामक दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे तीन लाखांचेे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, आगीचे कारण स्पष्ट नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...