आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा अनर्थ टळला:अहमदनगर महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोच्या परिसरात आग; सुदैवाने कुठलीच हानी नाही

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या तपोवन रोडवरील बंद करण्यात आलेल्या सावेडी कचरा डेपोत आज भीषण आग लागली. डेपोलगत असलेल्या महावितरणच्या सब स्टेशनलाही आगीची झळ बसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोठा अनर्थ टळला

मागील दोन वर्षांपासून सावेडी येथील कचरा डेपो बंद करण्यात आलेला आहे. मात्र, डेपोत जुना कचरा अद्यापही तसाच पडून आहे. आगीमध्ये झाडे, तसेच ठिबक सिंचनसाठी केलेली पाईपलाईन जळून खाक झाली आहे. कचरा डेपो शेजारी असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनलाही आगीची झळ बसली आहे.

कुठलीच हानी नाही

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली आहे. अग्निशमन दलाचे वाहनचालक सी.आर. भांगरे, पांडुरंग झिने, श्री.माडगे आदींसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. कचरा डेपोचा आवारात नव्याने ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. शेजारीच महावितरणचे मोठे सबस्टेशनही आहे. आग तात्काळ आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी अनेक वेळा सावेडी कचरा डेपोला आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...