आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयास आग, तिसऱ्या मजल्यावरील ऑडिट विभाग भक्ष स्थानी, दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील ऑडीट विभागाला शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत तिसरा मजला जवळपास पूर्णपणे आगीत खाक झाला आहे. महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाच्या दराने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

सायंकाळच्या सुमारास बँकेचे सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर बँकेच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याचे लक्षात आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशामक दलही दाखल झाले. सुमारे एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

घटनेनंतर नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लेखापरीक्षण विभागात सर्व वस्तू, फायली जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. या मजल्यावरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयही असून, त्यालाही आगीची झळ पोहोचली आहे. मात्र, त्या ठिकाणी नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले, प्रशांत पवार, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे हेही सायंकाळी उशिराने बँकेत दाखल झाले. आग विझवण्यात आल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान, घटनेनंतर जिल्हा बँकेच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात. त्यात लेखा परिक्षण विभागातील एक पंख्यामध्ये झालेल्या स्पार्किंगमुळे ही आग भडकली, असे समजले.

डीडीआर आफिसचे नुकसान नाही
आगीच्या घटनेची माहिती सर्वत्र पोहोचताच जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यातच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आग लागल्याचे वृत्त सोशल माध्यमातून व्हायरल झाले. मात्र सदरची आग जिल्हा बँकेच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला लागली असून यात उपनिबंधक कार्यालयाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे उपनिबंधक आहेर यांनी सांगितले.

घटनाक्रम : सायंकाळी ६.३८ वाजता स्पार्किंग होऊन आग लागली. सात वाजता संपूर्ण मजल्यावर आग भडकली. आठ वाजता आग आटोक्यात आली.

ऑडिटच्या फायली जळाल्या
बँकेच्या ऑडिट विभागाला आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सहा वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते ते निघून गेल्यानंतर ही घटना घडली आता कशामुळे लागली व त्यात किती नुकसान झाले, याची माहिती घेतली जात आहे. घटनेची चौकशी केली जाईल.''
रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक.

आगीच्या घटनेची चौकशी केली जाईल
बँकेच्या ऑडीट भागाला आग लागली असून यात नेमके किती नुकसान झाले व किती फायली जळाल्या याची माहिती घेतली जाईल. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. यात काही वेगळा प्रकार आढळल्यास त्यादृष्टीने ही कारवाई केली जाईल.''
शिवाजीराव कर्डिले, संचालक.

बातम्या आणखी आहेत...