आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी:शिर्डीजवळ मॉलला आग; कोट्यवधींचा माल खाक

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहीत छायाचित्र - Divya Marathi
संग्रहीत छायाचित्र

शिर्डीजवळ नगर -मनमाड रोडलगत असलेल्या निघोज गावातील श्री जंगदब ट्रेडर्स सुपर शॉपी मॉलला रात्री २ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत सुमारे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ५ जून रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास या सुपर शॉपीला मोठी आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे फर्निचर, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती भांडी रॅक, शेड, फ्रिज प्लास्टिक वस्तू आगीत खाक झाल्या. याबाबत माहिती मिळताच साईबाबा संस्थान शिर्डी नगर परिषद शिर्डी व नगर राहाता परिषद यांच्या अग्निशमन बंबांनी रात्री उशिरा आग आटोक्यात आणली. याबाबत शिर्डी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...