आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीची होणार चौकशी:नगर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात आग, तिसऱ्या मजल्यावरील ऑडिट विभाग भक्षस्थानी, दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील ऑडीट विभागाला शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत तिसरा मजला जवळपास पूर्णपणे आगीत जळाला. महापालिका व एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाच्या दराने दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग
बँकेच्या तिसऱ्या मजल्यावर लागलेली आग

सायंकाळच्या सुमारास बँकेचे सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर बँकेच्या तिसऱ्या मजल्यावरून धूर येत असल्याचे लक्षात आले. बँकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच बँकेकडे धाव घेतली. त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशामक दलही दाखल झाले. सुमारे एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान
आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान

घटनेनंतर नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लेखापरीक्षण विभागात सर्व वस्तू, फायली जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. या मजल्यावरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयही असून, त्यालाही आगीची झळ पोहोचली आहे. मात्र, त्या ठिकाणी नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, आधीच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव कर्डिले, प्रशांत पवार, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

आगीत पुर्णतः जळालेला ऑडीट विभाग
आगीत पुर्णतः जळालेला ऑडीट विभाग

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पेआ हेही सायंकाळी उशिराने बँकेत दाखल झाले. आग विझवण्यात आल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.

आगीनंतर ऑडीट विभागाची झालेली स्थिती
आगीनंतर ऑडीट विभागाची झालेली स्थिती

घटनेची चौकशी होईल - शिवाजीराव कर्डिले, संचालक, जिल्हा बँक

बँकेच्या ऑडीट भागाला आग लागली असून यात नेमके किती नुकसान झाले व किती फायली जळाल्या याची माहिती घेतली जाईल. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेची सखोल चौकशी केली जाईल. यात काही वेगळा प्रकार आढळल्यास त्यादृष्टीने ही कारवाई केली जाईल.

ऑडिट विभागातील फायली जळाल्या - रावसाहेब वर्पे, सीईओ, जिल्हा बँक

बँकेच्या तिसऱ्या मजल्यावरील ऑडिट विभागाला आग लागली आहे यात तेथील पाहिले जायचे दिसून येत आहे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सहा वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते ते निघून गेल्यानंतर ही घटना घडली आता कशामुळे लागली व त्यात किती नुकसान झाले याबाबतची माहिती घेतली जात आहे. घटनेची चौकशी केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...