आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर येथील बेसिस ट्रेनिंग रेजिमेंट 57 वा महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा वार्षिक सराव कॅम्प सुरू आहे. एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी कॅम्पला भेट देऊन प्रशिक्षणाची पाहणी केली. 10 दिवस चालणाऱ्या बटालियन एनसीसी वार्षिक सराव कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी पहाटे चार ते सायंकाळ पर्यंत खडतर सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते आहे. यात फायरिंग, ड्रील, मॅप रीडिंग आदींचा समावेश आहे.
450 विद्यार्थ्यांचा सहभाग
कॅम्पमध्ये नगर जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयामधील 450 विद्यार्थी सहभागी झाले आहे. दोन वर्षाच्या कालखंडा नंतर हा वार्षिक सराव कॅम्प होत आहे. बीटीआरचे 57 महाराष्ट्र बटालियनचे प्रमुख कर्नल पंकज साहनी यांनी ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांचे स्वागत केले. यावेळी सुभेदार मेजर नारायण ब्रम्हा, प्रशिक्षिक दशरथ सिंग, दंडपाल अधिकारी कॅप्टन अंकुश आवारे आदींसह सर्व महाविद्यालयांचे सहयोगी एन सी सी अधिकारी उपस्थित होते. सहभागी महाविद्यालयांच्या छात्रांनी पर्यावरण संरक्षणामध्ये एनसीसी छात्रांचे योगदान दर्शवणाऱ्या आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. या उपक्रमाचे कौतुक ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी केले.
चालण्या बोलण्यातून ओळख
देशाला जातीधर्माच्या नावाने तोडण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नात आहेत. देशाला पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता खूप महत्त्वाची आहे. एनसीसीमध्ये मिळालेली एकात्मतेची व स्वयंशिस्तची शिकवण छात्रांना आयुष्यभर कामास येईल. देशाचे चांगले व जबाबदार नागरिक एनसीसीत तयार होतात. स्वयंशिस्तमुळे चालण्या बोलण्यातून एनसीसी विद्यार्थी हजारोत ओळखले जातात. बीटीआर सारख्या सैनिकी क्षेत्रात हा कॅम्प झाल्याने सैनिकी जीवन अत्यंत जवळून पहावयास मिळाल्याने हे छात्र भाग्यवान आहेत. आता नव्याने आलेल्या अग्निपथ योजनेमुळे सैनिक भरतीत बदल झाला असला तरी ही योजना फायदेशीर आहे, असे एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी सांगितले
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.