आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारने १ मेपासून ६०० रुपये ब्रासने वाळू विक्री सुरू केली. मात्र वाळूचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्यामुळे १ मे रोजी सुरू झालेली वाळू विक्री थांबली आहे. मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून महसूल प्रशासनाने आता विविध नदीपात्रांमधून वाळू एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे.
सध्या महाराष्ट्रातील नायगाव येथील पहिल्या वाळू डेपोत १ हजार ब्रास वाळू जमा झाली आहे. पुढच्या आठवड्यात ग्राहकांना ही वाळू सहाशे रुपये ब्रास दराने दिली जाणार आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील पहिल्या वाळू डेपोतून एक कणही वाळूची विक्री झालेली नाही.
राज्य सरकारने नव्या धोरणानुसार ग्राहकांना ६०० रुपये ब्रासने थेट वाळू घरपोच देणे सुरू केले होते. नगर जिल्ह्यातील नायगाव (ता.श्रीरामपूर) येथे सुरू झालेल्या राज्यातील पहिल्या वाळू डेपोतून प्रायोगिक तत्त्वावर ही वाळू विक्री सुरु झाली होती.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सुरू झालेल्या वाळू विक्रीला मात्र आता खो बसला आहे. महसूल प्रशासनाला नगर जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये वाळूसाठा उपलब्ध करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडे मुबलक प्रमाणात वाळू नसल्यामुळे १ मे रोजी सुरू झालेल्या स्वस्त वाळूच्या शासनाच्या निर्णयाला ब्रेक लागल याने ग्राहकांचे स्वस्त वाळूचे स्वप्न देखील धुळीस मिळाले आहे.
मुबलक प्रमाणात साठा झाल्यानंतर विक्री करणार सध्या मुबलक प्रमाणात वाळू आमच्याकडे शिल्लक नसल्यामुळे वाळू विक्री बंद आहे. आम्ही नदीपात्रांमधून वाळू एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे. नायगाव येथील वाळू विक्री ही प्रायोगिक तत्त्वावर आहे. ग्राहकांची वाळूची मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही वाळूचा साठा अगोदर तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या राहाता तालुक्यापेक्षा वाळू डेपोपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर असलेल्या वैजापूर तालुक्याला ६०० रुपये ब्रासने घेतलेल्या वाळू वाहतुकीवर कमी खर्च लागतो आहे. विशेष म्हणजे या पहिल्या डेपोपासून वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) तालुक्यातील सुरणगाव, लाक अशी गावे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर आहेत. तर महसूल मंत्र्यांचा तालुका २३ किलोमीटर तर त्यांचे गाव लोणी हे ३५ किलोमीटर आहे.
स्वस्त वाळू वाहतुकीमुळे पडतेय महाग
नव्या धोरणातील निर्देशाप्रमाणे ट्रॅक्टर किंवा सहा चाकी वाहनातूनच वाळू वाहतूक करणे बंधनकारक आहे. साधारण ट्रॅक्टरच्या एका टाॅर्लीमध्ये एक ब्रास वाळू बसते. तर सहा चाकी वाहनात चार ब्रास वाळू बसते. पहिल्या टप्प्यात २० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राहकांनाच डेपोतून वाळू दिली जाते. एक ब्रास वाळू एका ट्रॅक्टरने डेपोपासून २० किलोमीटर अंतरावर घेऊन जायची असेल तर मजुरीसह दोन ते अडीच हजार रुपये लागतात. वाळू ६०० रुपयांची आणि वाहतूक खर्च अडीच हजार रुपये तर ती वाळू ग्राहकाला किमान तीन हजार रुपये ब्रासने पडते.
मुबलक प्रमाणात साठा झाल्यानंतर विक्री करणार सध्या मुबलक प्रमाणात वाळू आमच्याकडे शिल्लक नसल्यामुळे वाळू विक्री बंद आहे. आम्ही नदीपात्रांमधून वाळू एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे. नायगाव येथील वाळू विक्री ही प्रायोगिक तत्त्वावर आहे. ग्राहकांची वाळूची मागणी वाढण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही वाळूचा साठा अगोदर तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. नायगावच्या पहिल्या वाळू डेपोत १ हजार ब्रास वाळू जमा झाली असून, आणखी वाळू साठा जमा झाल्यानंतर वाळू विक्री पूर्ववत सुरू होईल.
-वसीम सय्यद गौण खनिकर्म, अधिकारी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.