आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर-पुणे मार्गावर धावली पहिली ई-बस:रापमचे पह‍िले वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते ई-बसला ह‍िरवा झेंडा

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य पर‍िवहन महामंडळाची पह‍िली बस 1 जून 1948 रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इतिहासाची बुधवार 1 जून 2022 ला पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान 'श‍िवाई' या राज्यातील पह‍िल्या ई-बस सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य पर‍िवहन महामंडळाचे पहिले वाहक असलेले अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवेला 74 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे. एसटीची पहिली बस माळीवाडा येथून पुण्याच्या द‍िशेने धावली होती. श‍िवाई ही 'ई-बस' ही याच मार्गावरून धावणार आहे. बुधवारी अहमदनगर शहरातील तारकपूर आगारातून या 'ई-बस' सेवेला प्रारंभ झाला.केवटे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, विभाग नियंत्रक विजय गीते, शिवाई ई बसचे वाहक जयदेव हेंद्रे व चालक गणेश साबळे आदी उपस्थ‍ित होते.

शिवाई ई- ही बस मध्ये 43 प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था

शिवाई ई-बसमध्ये 43 प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था असून प्रवासी सीट हे ‘पुश बॅक‘ प्रकारचे देण्यात आले आहे. प्रत्येक दोन सीटच्यामध्ये दोन्ही प्रवाशांचे मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र युएसबी पोर्ट देण्यात आले आहे. चालक केबिन मध्ये प्रवाशी घोषणा यंत्रणा बसविली आहे. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी यंत्रणा असून त्याचे बटन चालक कक्षात देण्यात आले आहे. प्रवासी कक्षातील हालचालीवर देखरेखीसाठी कॅमेरे प्रवाशी कक्षात बसविण्यात आले आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अँड्रॉईड टीव्ही बसविण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...