आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकल्पना:प्रथमच गुलाबी सखी मतदान केंद्र

कोपरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांना निर्भयपणे शासकीय-निमशासकीय संकल्पनेत सहभाग देता यावा यासाठी निवडणुक आयोगाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत गुलाबी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवली. आता ग्रामपंचायत निवडणुकीतही कोपरगांव तालुक्यात शिंगणापूर आणि माहेगाव देशमुख येथे गुलाबी रंगाचे सखी मतदान केंद्र उभारले.

भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी ही माहिती दिली. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, रेणुका विवेक कोल्हे यांनीही सखी मतदान केंद्र संकल्पना जाणून घेतली. तालुका निवडणुक निर्णय अधिकारी विजय बोरूडे यांनी सखी मतदान केंद्र संकल्पना विषद केली.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, नारीशक्ती जबाबदारीतून घेते भरारी, गुलाबी सखी मतदान केंद्र आणि येथे असलेले निर्भय वातावरण नक्कीच २८ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत महिलांचा टक्का निश्चित वाढेल. याप्रसंगी सरपंच सुनिता संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, संजय तुळस्कर, शिवा सुपेकर, मंगेश गायकवाड, मुन्ना पठाण आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...