आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना अटक; गच्चीवर गप्पा मारत बसलेल्या मित्रांवर तलवार केले होते वार

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गच्चीवर गप्पा मारत बसलेल्या मित्रांवर तलवार, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या पाच जणांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

महेश दशरथ मते (वय २३), अक्षय प्रदीप टेकाळे (वय २२, दोघे रा. बरबडे वस्ती, पाईपलाइन रोड, सावेडी), चंदन ऊर्फ मनिष साहेबराव ढवण (वय २१), शिवलिंग कैलास शिंदे (वय २३, दोघे रा. तागड वस्ती, तपोवन रोड, सावेडी), सोन्या ऊर्फ हेमंत दत्तात्रय कोहक (वय २३, रा. बोल्हेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. २३ मे रोजी रात्री पाईपलाईन रोडवरील पंचवटीनगर येथे घराच्या गच्चीवर रोहीत मिलन जोशी (वय २८) व अजित कल्याण बाबर हे गप्पा मारत बसलेले असताना १२ ते १४ जणांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...