आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएच.आय.व्ही (एड्स) सप्ताहनिमित्त स्नेहलयाच्या स्नेहाधार प्रकल्पाच्या वतीने "नवे जीवन - नवी आशा'या उपक्रमांतर्गत एच. आय. व्ही.(एड्स) संसर्गीतांसाठी राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात नोंदणी झाल्या पाहिजे पाच वधू -वर विवाहाच्या बंधनात अडकले आहेत.
अनाथ - निराधार व्यक्तींसाठी २ डिसेंबर २०२२ ला नवी उमेद – नवे जीवन - नवी आशा जगाविण्याकरिता सहजीवनाची ओढ असणाऱ्यांसाठी एच. आय. व्ही.(एड्स ) संसर्गीतांसाठी राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात २५० पेक्षा जास्त वधू - वरांनी आपली नाव नोंदणी केली होती. एकूण ८ वधू - वरांनी आपले जीवन साथी निवडले, त्यापैकी ५ नवं दाम्प्यत्यांचे मोठ्या दिमाखात विवाह झाले. या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेले वधू – वर मुंबई, सातारा, पुणे, अमरावती, नगर जिल्ह्यातील होते.
सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी , जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विक्रम पानसंबळ, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, उद्योजक प्रशांत मुथा, श्याम असावा ,नगरकर, अॅड. केवल, अॅड. राजे, अॅड. गायकवाड, राजीव गुजर, संजय बंदीष्टी, राजेंद्र शुक्रे ,मिलिंद कुलकर्णी, अॅड. श्याम आसावा, भरत कुलकर्णी, अनिल गावडे, हनीफ शेख, कॅनडा येथील महाराष्ट्र सेवा समितीचे सिद्दी आणि जीवन कायंदे, तायरकर दाम्पत्य उपस्थित होते.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील म्हणाल्या,समाजाने वाळीत टाकलेल्या दुर्लक्षित घटकांतील व्यक्तींना एकत्र आणणे महत्वाचे आहे. सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे आवश्यक आहे. यादृष्टीने अनाथ निराधार जोडप्यांचे सामुदायिक विवाह आयोजित करून स्नेहालयाने एक सामाजिक विकासाला प्रेरणा देणारी क्रांतिकारक कृती करत आहे. असे त्यांनी सांगितले.जागतिक एच. आय. व्ही.,एड्स सप्ताह निमित्त दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येते, असे स्नेहालयाचे संचालक प्रविण मुत्याल यांनी सांगितले.
वधुंचे कन्यादान ज्योती आणि अशोक भंडारी, डॉ. अदिती आणि विक्रम पानसंबळ, मंगल आणि अशोक जगताप, रेवती आणि प्रविण मुत्याल, मंगल भुजबळ आणि सुधीर भुजबळ यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.