आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:बारावीच्या पेपरफुटी प्रकरणी नगरमधून‎ मुख्याध्यापकासह पाच जणांना अटक‎

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या पेपर फुटी प्रकरणी मुंबईच्या गुन्हे‎ शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री नगर तालुक्यातील‎ रुईछत्तीसी येथील आनंद इंग्लिश विद्यालयातील‎ मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक केली.‎ प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून तो सामाजिक‎ माध्यमातून पाठवून देऊन प्रत्येकांकडून दहा हजार‎ रुपयांना घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तीच‎ प्रश्नपत्रिका मुंबईतील दादर येथील एका परीक्षा‎ केंद्रावर सापडल्याने हे प्रकरण समोर आले आहे.

‎ मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथक बुधवारी रात्री रुईछत्तीसी‎ गावात दाखल झाले होते. येथील आनंद इंग्लिश‎ विद्यालयातील किरण दिघे, अर्चना भामरे, भाऊसाहेब‎ अमृते, वैभव तरटे व सचिन महारनवर यांना पथकाने‎ ताब्यात घेतले. यामध्ये मुख्याध्यापकासह दोन शिक्षक,‎ एक संस्थाचालक व शाळा मालकाच्या मुलीचा‎ समावेश आहे. तशी नोंद या पथकाने नगर तालुका‎ पोलीस ठाण्यात केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...