आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:मोकाट जनावरांच्या हल्ल्यात पाच जण जखमी

घोडेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोडेगावात मोकाट फिरणाऱ्या सुमारे चाळीस पन्नास जनावरांपैकी एका जनावराने केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. गुरुवारी सकाळी भिल्ल वस्तीमधील एका महिलेला मोकाट बैलाने ढकलून दिल्याने ती जखमी झाली, एकनाथ जाधव हे दूध आणावयास जाताना त्यांनाही तीन वेळा उचलून फेकले, पुरंदरे वाड्या मागील रस्त्यावर धनंजय राजे व प्रकाश शिंदे यांना धडक देत जखमी केले.

ग्रामपंचायतने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. ही जनावरे ग्रामपंचायत कोंडवाड्यात घालावी. नागरिकांना सुरक्षित वावर करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...