आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्री:मनपाकडून शहरात ध्वजविक्री सुरू; दोन दिवसांत 2368 झेंड्यांची विक्री

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नगर शहरात राबविल्या जात असलेल्या हर घर झेंडा उपक्रमासाठी महापालिकेकडून तिरंगा ध्वजाची विक्री सुरू करण्यात आली आहे. मनपा मुख्यालयासह चारही प्रभाग कार्यालयांमध्ये विक्री केंद्र उभारण्यात आले आहेत. दोन दिवसात सुमारे २३६८ झेंड्यांची विक्री करण्यात आल्याची माहिती नोडल अधिकारी तथा सहायक आयुक्त सचिन राऊत यांनी दिली.

नगर शहरात महानगरपालिकेने ७५ हजार ९६० ध्वजांची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेमार्फत ५१ हजार ध्वजांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तर २५ हजार ध्वज महापालिकेने खरेदी केले आहेत. महापालिका मुख्यालयासह चारही प्रभाग कार्यालयांमध्ये ध्वज विक्री केंद्र गुरुवारपासून कार्यरत करण्यात आले आहे. या ठिकाणी नागरिकांना ३० रुपयांमध्ये तिरंगा ध्वज विक्री केला जात आहे. दोन दिवसात २३६८ झेंड्यांची विक्री झाल्याची नोंद आहे.

बातम्या आणखी आहेत...