आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड परिसरात पूर:अडीच दशकानंतर सर्वाधिक पाऊस, नऊ तास सुरु होती संततधार

अहमदनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निघोज परिसरात तसेच आसपासच्या कुकडी नदी परिसरातील गावांत बुधवारी (7 सप्टेंबर) रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील कुंडमाउली कुकडी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला.

मळगंगा मंदिराच्या पाठीमागील कुंडात मंदिर समांतर पाणी आले आहे. कुकडी प्रकल्पातील धरणांचा पाणीसाठा 75 ते 80 टक्के झाल्यानंतर कुकडी प्रकल्पातील धरणांचा विसर्ग म्हणून पाणी सोडण्यात येते. मात्र जोरदार झालेल्या पावसाने कहर केला. गेल्या पाच पंचवीस वर्षात पावसामुळे आलेला पूर पाहण्याचे भाग्य पर्यटक,भाविक आणि ग्रामस्थ यांना लाभणार आहे.

कुंडातील पाणी पाहण्यासाठी गर्दी

महिनाभरापूर्वी धरण क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाल्याने पाच ते दहा हजार क्युसेक्सने धरणातील पाणी कुकडी नदीत सोडल्याने रांजणखळगे कुंडातील पाणी पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्यानंतरही कुकडी नदी परिसरातील गावांत पावसाचे प्रमाण जास्त होते. मात्र बुधवारी रात्री आठ ते पहाटे पाच वाजेपर्यंत जोरदार पावसाने कुकडी नदीला पूर आला आहे.

नदीकाठच्या लोकांनी सावध राहावे

अतिवृष्टी किंवा पुरपरस्थीतीचा अंदाज घेऊन कुकडी नदी काठच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. हवामान खात्याने रविवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पर्यटक, भाविक व ग्रामस्थ यांनी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील पुराचे पाणी पाहण्यासाठी जवळ न जाता कुंडाजवळ असणाऱ्या उंच पातव्यावर जाऊन पाणी पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

25 वर्षात प्रथमच मोठा पाऊस

जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील पाण्याच्या आकडेवारीचा विचार केला तर जवळपास हे पाणी पंधरा ते वीस हजार क्युसेक्स आहे. गेल्या पाच पंचवीस वर्षात, असे पाणी आपण प्रथमच पाहत असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले आहे.

निसर्गानं हिरवेपण पांघरलेय

कुकडी नदीचा खळाळता प्रवाह आणि रांजणखळग्यांतून पाणी उसळताना येणारा विशिष्ट प्रकारचा आवाज, आपलं लक्ष वेधून घेतात. आसपासची झेंडूच्या फुलांची शेतीही वातावरणनिर्मितीत भर घालत असते. पावसाळ्यात हा परिसर आणखी देखणा दिसतो. निसर्गानं हिरवेपण पांघरलेले असते. छान गारवा वातावरण भारून टाकत असतो. कुकडी नदीचे पात्र बघूनच डोळ्यांचे पारणं फिटते. निसर्गाचा हा रंगपट नजरेत कसा आणि किती साठवायचा, असा प्रश्न पडतो.

रांजणखळगे 200 मी लांब

पावसाळ्यात प्रवाह जोरात असतो. त्यामुळे रांजणखळग्यांपर्यंत जाण्यासाठी काळजी घ्यावी लागते. वारा, ऊन पाऊस यांच्या माऱ्यामुळे नदीच्या पात्रात वेगवेगळ्या आकाराचे खड्डे तयार झाले आहेत. हेच ते प्रसिद्ध रांजणखळगे. 200 मी. लांब आणि 60 मी. रुंद अशा भागात निसर्गाचा हा अनोखा खेळ पाहायला मिळतो.

बातम्या आणखी आहेत...